दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रवास

जगामध्ये वित्तीय क्षेत्रात काम करणारी … विश्वासार्ह विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन बिमा निगम,सर्वांची परिचित एल. आय.सी. 3632 शाखा व सॅटेलाईट ऑफिसेस… जवळजवळ 98000 सेवा देण्यासाठी सुसज्ज स्टाफ आणि भारतभर विम्याचे महत्त्व पटवून देत लोकांना सेवा देणारे लाखो विमाप्रतिनिधी.
उत्तम संरचना असणारी ही विश्वासार्ह सरकारी विमा कंपनी आणि त्याचाच एक भाग असलेली आणि 1971 मध्ये स्थापना झालेली मालवण 827 ही छोटीशी शाखा. या शाखेत सध्या एकूण स्टाफ अवघा दहा आणि 213 विमा प्रतिनिधी. पण शाखाधिकारी सतेजा बोवलेकर यांच्या नेतृत्वाखाली या शाखेने नुकताच इतिहास रचला. तब्बल 54 वर्षांनी या शाखेने एल .आय.सी. च्या कोल्हापूर विभागा ने आखून दिलेली सात प्रकारची टार्गेट्स पूर्ण करत इतिहास रचला. हे शिवधनुष्य पेलणे खचितच सोपे नव्हते. पण शाखाधिकारी सतेजा मॅडम च्या नेतृत्वाखाली 31 मार्च अखेर सर्व टार्गेट पूर्ण करण्यात ब्रँच यशस्वी ठरली.
9 ऑक्टोबर,1995 मध्ये सतेजा सचेतन बोवलेकर पूर्वाश्रमीच्या वैशाली चव्हाण या भारतीय आयुर्विमा मंडळ दापोली शाखेत मध्ये रुजू झाल्या. विवाहानंतर मालवण.. म्हापसा,.. राजापूर..कणकवली अश्या अनेक शाखांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यावर मार्केटिंग क्षेत्रात त्या वळल्या. असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून तब्बल अडीच वर्ष आणि शाखाधिकारी म्हणून तीन वर्ष त्यांनी कणकवली मध्ये काम पाहिले. या काळात अगदी पाच पिलर पर्यंत त्यांनी टार्गेट्स पूर्ण केली. मार्केटिंग साठी आवश्यक असणारे नॉलेज… धडाडी… गोड बोलणे.. संयमी वृत्ती.. नेतृत्व गुण या सगळ्याचा एक उत्तम मिलाफ सतेजा मॅडम यांच्याकडे आहे. एखादी स्त्री शाखाधिकारी म्हणून काम करते तेव्हा ती संसार आणि नोकरी तीही मार्केटिंग क्षेत्रात करणे म्हणजे खरं तर तारेवरची कसरत. पण मालवण शाखेतील विकास अधिकारी..विमा प्रतिनिधी.. क्लिआ … स्टाफ.. अधिकारी वर्ग या सर्वांच्या सहकाऱ्याने सतेजा मॅडम नी सात पिलर टार्गेट पूर्ण केले आणि मालवण शाखेचे.. कोल्हापूर विभागाचे नाव उंचावले. अशी कामगिरी करणारी मालवण ही कोल्हापूर विभागातील आणि वेस्टर्न झोन मधील दुसरी शाखा ठरली आहे. मालवण शाखे सारखी छोटी शाखा अशी अचंबित कामगिरी करू शकली ते केवळ सतेजा मॅडम यांचे कुशल नेतृत्व.. जिद्द… ध्यास… LIC संस्थेवरील दृढ विश्वास यामुळेच
…हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवते…
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नही होती..
सतेजा मॅडम ज्या शाखेत काम करतील तिथे नक्कीच कोणती ना कोणती achievement होईल याची खात्री मॅनेजमेंट ला असायची. कणकवली शाखेत तर त्यांनी बँक assurance… Clia… या कॅटेगरी मध्ये तर जोरदार कामगिरी केली होती. कधी तीन तर कधी पाच काउंट वर शाखा अग्रेसर असायची ती केवळ सतेजा मॅडम यांच्या मार्केटिंग स्कील मुळे. अर्थात निर्भेळ यश मिळाले ते या आर्थिक वर्षात. पण त्यांच्या प्रयत्ना बरोबरच त्यांना मोठी खंबीर साथ मिळाली ती कोल्हापूर चे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर आदरणिय श्री. विवेक देशमुख सर, मार्केटिंग मॅनेजर श्री. अभय कुलकर्णी सर, मॅनेजर सेल्स कोशटवार सर, प्रॉडक्ट मॅनेजर संजय पाटील… डेप्युटी मॅनेजर Clia सुरेंद्र मोरे … मालवणचे असिस्टंट ब्रँच मॅनेजर किरण पालव यांची.
क्रिकेट मध्ये जसे शेवटचे शतक महत्वाचे ठरते तसे शेवटच्या दोन दिवसात टार्गेट पूर्ण होण्यासाठी तब्बल 350 पॉलिसीची आवश्यकता होती. त्यावेळी सतेजा मॅडम.. यांनी आणि त्यांच्या सर्व मार्केटिंग विंग ने जे काही षटकार मारले त्याला तोड नाही. मालवण मधील ग्राहकांनी संस्थे वर दाखवलेला विश्वास सार्थकी लागला.
पुन्हा एकदा या आर्थिक वर्षात अशीच भरघोस कामगिरी त्यांच्याकडून होवो आणि मालवण शाखेचे नाव भारतीय स्तरावर उंचाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मीरा पोतदार
सहायक प्रशासनिक अधिकारी
कणकवली शाखा
8446003592