पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नाधवडे येथील मंजूर झालेल्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

नाधवडे येथील 3 रस्ते विकास कामांसाठी 20लाख निधी मंजूर
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या गावातील रस्त्याचा विकास व्हावा व लोकांची गैरसोय दूर व्हावी या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष देऊन नाधवडे येथील रस्ते विकास कामांसाठी जवळपास 20लाख एवढा निधी मंजूर करून दिला. या रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. यामध्ये नाधवडे येथील बौध्द वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी 5 लाख रुपये मंजूर झाले आहेत.तर नाधवडे भटवाडी मुख्य रस्ता मांडवकर घर ते नेवरेकर घर रस्ता 3 लाख 99 हजार एवढा निधी मंजूर झाला आहे. व ईश्वलकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे यासाठी 10 लाख एवढा निधी मंजूर झाला असून या तिन्ही रस्त्याच्या विकासकामंचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष -सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, सरपंच लीना पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम इस्वलकर, राहुल इस्वलकर,ग्रामसेवक-अरविंद कांबळे, उपसरपंच प्रफुल्ल कोकाटे,ग्रामपंचायत सदस्य रोहित पावसकर, श्रीरंग पावसकर,संतोष नाचणेकर, दिलीप जाधव,व गावातील ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.