ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांची सहविचार सभा आवश्यक : रणजित देसाई 

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन संपन्न 

आदर्श ग्रंथालय आणि कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण

पालकमंत्री, मंत्री, राजकीय पुढाऱ्यांना निमंत्रण जाऊनही अधिवेशनकडे पाठ

निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय पातळीवरील अनेक  महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री, संबधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या माध्यमातून सहविचार सभा घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे  प्रतिपादन  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते रणजीत देसाई यांनी  गोवेरी येथे ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात केले.  यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालये तसेच या  ग्रंथालयात काम करणाऱ्याना  आदर्श ग्रंथालय आणि आदर्श कार्यकर्ता  अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
     जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वार्षिक अधिवेशन ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय गोवेरी यांच्या सहकार्याने जिल्हा  ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गोवेरी वाचनालयाच्या सभागृहात पार पडले.  या  अधिवेशनाचे उद्घाटन कोंकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश  मसके  यांच्या हस्ते झाले.  सुरुवातीला  गोवेरी गावातील घोलकरवाडी सुंदरवाडी  ते सत्पुरुष मंदिर या ठिकाणी सजवलेली  ग्रंथदिंडी ढोलताशांच्या  गजरात  कार्यक्रमस्थळी आणण्यात आली. जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वार्षिक अधिवेशनाची सुरुवात गोवेरी  घोलकरवाडी येथून ग्रंथ दिंडीने करण्यात आली.    


यावेळी सामाजिक कार्यकर्ते एस पी सामंत, गोवेरी  सरपंच  दशरथ परब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे,  कोंमसापचे पदाधिकरी धाकू तानावडे,  ऋतुजा केळकर, महेश बोवलेकर,  विठ्ठल कदम, जयप्रकाश नार्वेकर, महेश गावडे, राजन पांचाळ,  संजय शिंदे, नाथा मडवळ, अनुष्का शिवडावकर,  प्रवीण भोगटे,  विजय पालघर, नंदकिशोर गावडे, स्वरा गावडे, सतीश गावडे, उमेश गावडे, सुदाम गावडे, अंकुश गावडे, गोविद गावडे, नेरूर गोवेरी  शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती खानोलकर, आप्पा भोगटे,  गणेश शिरसाट, व्ही के परब, सत्यवान हरमरकर, सचिन परुळकर, डॉ अमोघ चुबे, सौ  दळवी, प्रसाद दळवी, श्री तळेकर,तसेच    जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी कार्यकर्ते गोवेरी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.    
यावेळी आदर्श संस्था  पुरस्कार श्री वासुदेवानंद  सरस्वती वाचनालय माणगाव ता कुडाळ,  श्रीमंत पार्वती देवी वाचनालय तुळस तालुका वेंगुर्ला, आदर्श कार्यकर्ता  पुरस्कार रमेश राऊळ  कार्यवाह श्रीदेवी सा’तेरी वाचनालय वेतोरे,  देवदत्त चुबे  अध्यक्ष श्री देव जगन्नाथ वाचनालय ग्रंथसंग्रहालय केरवडे तर्फ  माणगाव, आदर्श सेवक पुरस्कार दीपा सुकी ग्रंथपाल श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली,  महेंद्र पटेल  ग्रंथपाल श्रीराम  वाचन मंदिर व क्रीडाभुवन सावंतवाडी या सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. 
   यावेळी बोलताना रणजीत देसाई म्हणाले, ग्रंथालयाचे अनेक प्रश्न अनेक समस्या आहेत.  हे प्रश्न सोडवताना बैठकीतून हे प्रश्न सुटणार नाही किंवा निवेदन देऊन सुटणार नाहीत.  प्रत्यक्ष  मंत्री संबंधित  विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून सहविचार सभा होऊन या सभेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी मी  पुढाकार घेईन.  आज कमी मानधनात  ग्रंथालयाचे कर्मचारी मानव सेवा म्हणून सेवा बजावत आहेत.   त्यांना न्याय मिळाला पाहिजे.   मंगेश मस्के यांनी ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत  होण्यासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.  शासनाचे आता जे काही अनुदान आले आहे ते  अनुदान या मार्च महिन्यातच मिळाले पाहिजे.  यासाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा.   ग्रंथालय वाढीव निधीमुळे उभारी मिळेल जे काय ग्रंथालयाचे प्रश्न आहे ते  सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगून शालेय मंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी भ्रमणध्वनी वरून ग्रंथालयाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावले जातील असे सांगितल्याचे  मसके  यांनी सांगितले.      
श्री वैद्य म्हणाले  आज सिंधुदुर्गात ग्रंथालयात 350 कर्मचारी कार्यरत आहेत.  त्यांना सन्मानाने जीवन जगता  यावे एवढा पगारसुद्धा  मिळत नाही ही शोकांतिका आहे.  शासन फक्त गाव तिथे  वाचनालय अशा फक्त घोषणा करत सर्वांचीच मोठ्या प्रमाणात दिशाभूल करत आहे.  जर ग्रंथालय वृद्धिंगत करायचं नसेल तर घोषणा कशासाठी? असा सवालही  वैद्य यानी उपस्थित करून सरकारच्या कार्यपद्धतीबाबत  नाराजी व्यक्त केली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा  सहकार्यवाह महेश बोवलेकर यांनी केले सूत्रसंचालन महेश गावडे व राजन पांचाळ यांनी केले आभार सतीश गावडे  यांनी  मानले

निलेश जोशी, कोकण नाऊ,कुडाळ.

error: Content is protected !!