उपांत्य विजेता ट्रॉफी आश्रमाला अर्पण; युवकांचा आदर्श उपक्रम

अष्टविनायक आंब्याचे गाळू क्रीडा मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अष्टविनायक आंब्याचे गाळू पडवे मित्र मंडळाच्या युवा खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविला. नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य विजेतेपद मिळवलेल्या संघाने आपली ट्रॉफी स्वतःकडे न ठेवता संविता आश्रमाला अर्पण केली.
मंडळाच्या सदस्यांनी आश्रमाला भेट देऊन तेथील रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपांत्य विजेता ट्रॉफीसह भिंतीवरचे घड्याळ आश्रमाला सुपूर्द केले. हे साहित्य जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांच्याकडे देण्यात आले.
याशिवाय, खेळाडूंनी आश्रमातील बांधवांना समोशांचा अल्पोपाहार स्वहस्ते वाटप करून आनंद वाटला. क्रीडा स्पर्धेतून एकत्रित जमा झालेली २,००० रुपयांची निधी रक्कमही आश्रमाच्या कार्यासाठी देण्यात आली.
या उपक्रमात सिद्धेश दळवी, संतोष परब, समीर अपराध, विशाल परब, प्रथमेश परब, ओंकार परब, विजय परब, अथर्व परब, गणेश अपराध, हेमंत परब, अभय परब आणि सुजल चव्हाण यांनी सहभाग घेतला.
समाजात क्रीडेसोबतच सामाजिक जाणीव जपणारा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!