भिरवंडे केंद्र शाळेला प्रिंटर झेरॉक्स प्रदान

शेतकरी सेवा सोसायटी चा उपक्रम

  भिरवंडे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा भिरवंडे क्रमांक एक या शाळेसाठी आज प्रिंटर झेरॉक्स प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भिरवंडेकर मराठा समाज मुंबईचे उपाध्यक्ष मोहन सखाराम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र शाळेमध्ये आज सकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर सावंत, संचालक तुषार सावंत, सुहास सावंत, नंदकिशोर मेस्त्री, अरविंद सावंत, सौ. स्मिता प्रदीप सावंत, मंगेश सावंत, प्रकाश घाडीगावकर सचिव सौ. श्रद्धा सावंत, सौ. सुविधा सावंत, कु. अर्पिता सावंत आदी उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. गावकर यांच्याकडे चेअरमन बेनी डिसोजा यांच्या हस्ते या प्रिंटरचे हस्तांतरण करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव अशी मदत केली जाते. यापूर्वी खलांतर शाळा क्रमांक २ या शाळेसाठी ही लॅपटॉप साठी आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी बोलताना मोहन सावंत म्हणाले, शैक्षणिक गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. मुंबई भिरवंडेकर मराठा समाजाच्या वतीने आवश्यक अशा शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केला जाईल. शिक्षकांनी त्याची मागणी करावी गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक वस्तू आम्ही प्रदान करण्याचा प्रयत्न करू असे विचार मांडले. तसेच प्रकाश घाडीगावकर यांनी या शाळेमधून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकले आहेत. यापुढे या प्रशालेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याबाबत क्रीडा क्षेत्रातील कामगिरी बाबत किंवा शिष्यवृत्ती बाबतचे क्रमांक येतात किंवा नावलौकिक ज्या विद्यार्थ्यांचे होते अशा विद्यार्थ्यांची नावे फलकावर लावीत अशी विनंती केली. चेअरमन बेनी डिसोझा यांनी शैक्षणिक उपक्रमाबाबत संस्थेने नेहमीच पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, तसेच शेतकऱ्यांना कर्ज वाटप हाच उद्देश नसून गावातील शैक्षणिक उपक्रमात हातभार लावणे हाही हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!