पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आणि नाम फाउंडेशनच्या सहकार्याने वागदे गडनदीपात्र गाळमुक्त

वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या प्रयत्नातून यशस्वी मोहीम.

कणकवली/प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वागदे गडनदीपात्रातील गाळ उपसा उपक्रम नुकताच पार पडला.सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली,समाजसेवे तील अग्रणी “नाम फाउंडेशन” यांच्या सहकार्याने आणि वागदेचे कर्तबगार व दूरदृष्टी असलेले सरपंच संदीप सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनपूर्वक राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नदीपात्रातील साचलेला गाळ काढून टाकण्यात आला.कोकण पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे यापूर्वी निर्माण झालेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली.चार ते पाच वर्षांपूर्वी आलेल्या वादळी महापुरावेळी नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे पाणी आसपासच्या गावांमध्ये घुसले होते.याच धोक्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा गाळ उपसा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.यामुळे अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होऊन भविष्यातील संभाव्य आपत्तीचा धोका कमी होणार आहे.या उपक्रमामुळे कणकवली तालुक्यातील वागदे गावासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वागदे सरपंच संदीप सावंत आणि ग्रामस्थांनी,पालकमंत्री श्री.नितेश राणे आणि नाम फाउंडेशन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!