आम्ही मालवणी असल्याचा अभिमान-संजय घाडी उपमहापौर मुंबई

मालवणी लोक समोर असुदे किंवा नसुदेत मी कायम मालवणीच बोलत असतो. मालवणी भाषे चा आम्हाला अभिमान आहे. ती रसाळ आहे .आणि तिचे खरे वतनदार आम्ही तळकोकणातील रहिवाशी असल्याचे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई येथे केले.
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई (बाेरीवली विभाग) आयोजित *वार्षिक स्नेहसंमेलन व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम रविवार दिनांक १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपनेत्या व प्रवत्या सौं. संजना संजय घाडी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष घनश्याम गांवकर गजानन घाडीगांवकर( सरचिटणीस ),श्री. प्रफुल्ल घाडी (विभाग अध्यक्ष), श्री. सतीश घाडीगांवकर (विभाग सचिव ), श्री. भिकाजी गांवकर सौ. दर्शना घाडी, नामदेव घाडी, संतोष घाडीगांवकर, अनंत घाडी आदिंसह बहुसंख्य समाज बंधु – भगीनी उपस्थित होत्या .या सुवर्ण क्षणी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित अशा एन्ड्युरन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ३ सुवर्ण पदक मिळवल्याबद्ल कु. साईराज जगदीश घाडी याचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या जेष्ठ पदाधिकारी, समाज बांधव यांना समाज भूषण पुरस्काराने संजय शंकर घाडी( उपमहापौर)यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला जागा उपलब्ध करुन देणारे स्कूल व्यवस्थापन, डेकोरेशन, अर्जुन बापर्डेकर ( पत्रकार), उपस्थित समाज बांधव यांचे आभार सचिव सतीश घाडीगांवकर यानी मानले.





