युद्धाची झळ कणकवलीत, हॉटेल व्यवसायिकांनी घेतला चुलीचा आधार

कणकवली पटवर्धन चौकात चहा विक्रेत्याने दुकानाबाहेरच पेटवली बॅटरी वरची चूल

कणकवलीत गॅस टंचाईचा अनेकांना फटका

अमेरिका इस्त्राईल व इराण यांच्यामध्ये गेले पंधरा दिवस सुरू झालेल्या युद्धाची झळ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील बसू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस गॅस टंचाई भेडसावत असताना आता गॅस अभावी हॉटेल मालकांना चुलीचा आधार घ्यावा लागला आहे. कणकवलीत आज सोमवारी सकाळी याची प्रचिती घेता आली. सकाळच्या सत्रात कणकवलीतील एका हॉटेल व्यवसायाने आपल्या दुकानाच्या बाहेर बॅटरी वरची चूल पेटवत चहा केला. पटवर्धन चौकात सकाळच्या सत्रात मजूरदारांची होणारी गर्दी पाहता गॅस नसल्याने चूल पेटवूनच चहा विक्रेत्याने आपला व्यवसाय सुरू केला. त्यामुळे इस्राईल अमेरिका व इराण युद्धाची झळ आता हॉटेल व्यवसायिकांना चांगल्या प्रकारे भेडसावू लागली आहे.

error: Content is protected !!