पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारातून उद्या आंबा काजू बागायतदार संदर्भात विधानभवनात महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाणार आढावा

कोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना

हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अडचणीत सापडलेले असताना त्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विधान भवन येथील मंत्रिमंडळ सभागृहात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्यासहित आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर व कोकणातील सर्व मंत्री व आमदार खासदार यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. 17 मार्च रोजी दुपारी 3.15 वाजता विधान भवनात मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्वच आंबा आजूबागायतदार शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!