आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चष्मे वाटप

लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मोफत चष्मे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे ,आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, मालवण प़चायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर,अभय भोसले, पंकज आचरेकर,मांगिरीष सांबारी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅ मुजावर,उदय घाडी,विजय कदम, गुरुप्रसाद कांबळी यांसह जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.





