जिल्हा परिषद अध्यक्ष पदाकरिता प्रमोद कामत यांचे नाव आघाडीवर

काही वेळातच अध्यक्षपदाच्या नावाचा लखोटा उघडणार
अध्यक्षपदासाठी निष्ठावान कार्यकर्त्याला संधी की धक्का तंत्र काही वेळातच स्पष्ट होणार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाकरिता आज निवडणूक होणार असून जिल्हा परिषदेवर महायुतीचे एक हाती वर्चस्व असल्यामुळे ही निवड जवळपास बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे. परंतु अध्यक्ष पदाकरिता भाजपा तीन वर्ष व शिवसेना दोन वर्ष असा फॉर्म्युला ठरलेला असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये भाजपाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असताना आता अवघ्या काही वेळेतच अध्यक्षपदाच्या नावाचा लखोटा उघडला जाणार आहे. यामध्ये प्रमोद कामत हे राणेंचे जुने निष्ठावान कार्यकर्ते यांचे नाव सध्या अध्यक्ष पदाकरता आघाडीवर असून जवळपास त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु यासोबत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्याकडून ऐनवेळी धक्का तंत्र अवलंबले जाणार का? ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. अध्यक्ष पदाकरिता दोन तीन नावे चर्चेत असताना कामत यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.




