मोबाईल सोडून ग्रंथरुपी गुरुंकडे वळा – श्री. शिरोडकर
रा. अं. परब ग्रामवाचनालय कोचरा यांच्या तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
निलेश जोशी । कुडाळ : मोबाईल सोडून ग्रंथरूपी गुरूंकडे वळा असे आवाहन कोचऱ्याचे नवनिर्वाचित उप सरपंच श्री. शिरोडकर यांनी केले. रा. अं. परब ग्रामवाचनालय कोचरा यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. शिरोडकर बोलत होते.
रा. अं. परब ग्रामवाचनालय कोचरा यांच्यावतीने प्राथमिक, माध्यमिक गटात रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे तसेच शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुलांनी आपल्यातील कलागुणांचा विकास करावयाचे आवाहन श्री. शिरोडकर यांनी अध्यक्षस्थानवरून बोलताना केले. वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी, महेश परब यांच्या भविष्यातील दूरदृष्टीला दाद दिली. गावपातळीवर शिकता शिकता खूप मोठे होऊन गावाचे नाव उज्ज्वल करावयाचा संदेश दिला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , सन्मानचिन्ह ,रोख रक्कम व गुलाबपुष्प देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शैलेश तेली, विजय कामतेकर, विष्णू फणसेकर, गुरुनाथ केरकर सौ. यज्ञा साळगांवकर, सद्गुरू साटेलकर बक्षिसपात्र विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सौ. शिरसाट, हेमंत नाईक यांनी सहाय्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. यज्ञा साळगांवकर यांनी व आभार गुरूनाथ केरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व दाते, परीक्षक म्हणुन काम केल्याबद्दल टीम पाट हायस्कूल यांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.