अखिल महिला सेल कुडाळने जपली माणसातील माणुसकी
‘स्वप्ननगरी’ ला भेट देऊन केले जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
जागतिक महिला दिनाचे औचित्य
निलेश जोशी। कुडाळ : स्वप्ननगरी… दिव्यांगांच्या स्वप्नांना आकार देणारी पंखांना बळ देणारी अशी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड मोरे संस्था येथे अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ, महिला सेल कुडाळ यांनी महिला दिनाचे औचित्य साधून भेट दिली. यावेळी जीवनावश्यक वस्तू जसे की गहू, डाळ, कडधान्य, तेल, मसाले, गूळ व खाऊ इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या व्यवस्थापिका श्रीम. जयश्री गोखले व दिव्यांग बांधव यांच्याशी महिला सेल कुडाळने संवाद साधला. हेल्पर्स ऑफ दि हॅण्डी कॅप्ड कोल्हापूर संस्थेचा ‘स्वप्ननगरी – अपंगार्थ वसतिगृह तथा पुनर्वसन केंद्र उपक्रम फारच प्रेरणादायी वाटला.या आपल्या दिव्यांग बांधवांसाठी महिला सेलच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘जीवनावश्यक वस्तू जसे की गहू, डाळ, कडधान्य, तेल, मसाले , गूळ व खाऊ इत्यादी सर्व वस्तू देण्यात आल्या.
श्रीम. गोखले यांनी या संस्थेचा इतिहास महिला सेल कुडाळ समोर उलगडाला. संस्थेच्या संस्थापक नसिमा हुरजुक व रजनी देशपांडे या दिव्यांग भगिनी आहेत. महिला म्हणून त्या कोठेही कमी पडल्या नाहीत तर अपंगत्वावर मात करून कोल्हापूर बरोबरच सिंधुदुर्गातही अपंगांच्या सेवेसाठी त्यांनी कार्य केले. दिव्यांगाना स्वबळ, उभे राहण्याची ताकद त्यांनी दिली. त्याचे उत्तम उदा आम्हास या मोरे संस्थेमध्ये पाहावयास मिळाले.
सुख-दुःखाचे घास दे । परी पचवायची शक्ती दे
पराभवाचे घाव झेलता । हसवायची युक्ती दे
या प्रार्थनेने सुरुवात करून येथील दिव्यांग बांधव दैनंदिन जीवन सुसहयपणे जगताना दिसतात. ‘काजू उदयोग ‘ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘दिव्यांग असून देखील, त्यांची शैक्षणिक प्रगती नसली तरी प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे काम मिळावे व प्रत्येकाने स्वावलंबीपणे व आपले दुःख विसरुन आनंदात जगावे ‘ हे एकच ध्येय या संस्थेचे जवळून पाहावयास मिळाले. अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघ महिला सेल कुडाळ यांचा हा माणसातील माणुसकी जपण्याचा उपक्रम ख-या अर्थाने सार्थ ठरला. ‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे ,माणसाने माणसाशी माणसासम वागणे ‘असे म्हणत या ‘दिव्यांग बांधवांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू ‘अशी उपस्थित सर्व महिलांनी दिव्यांगांना खात्री दिली.
या अनोख्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ राज्य कोषाध्यक्षा श्रीम.विनयश्री पेडणेकर, जिल्हा अध्यक्ष राजाराम कविटकर, जिल्हा सरचिटणीस भिवा सावंत, शेडगेसर जिल्हा कार्यकारिणी, अरूणा घाटकर व स्वप्नाली सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष श्री वारंग, श्रीम. अर्चना देसाई , श्रीम.शुभांगी आचरेकर, कुडाळ महिला सेल अध्यक्षा श्रीम. प्रणाली कविटकर व सहसचिव साक्षी तुळसुलकर, श्रीम.पूजा कविटकर, श्रीम. प्रेरणा वारंग, श्रीम. मनाली बांदेकर, श्रीम. श्रद्धा शेडगे,श्री. तुळसुलकर, श्री. गोसावी सर व समस्त अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघ महिला सेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. गौरी गोसावी यांनी केले व आभार श्रीम. गौरी वेर्लेकर यांनी व्यक्त केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.