शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिला मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस
अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचीही गरज
रविकिरण तोरसकर यांची प्रतिक्रिया
ब्युरो न्यूज । मालवण : शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिला मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस दिल्याचे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना भाजपाचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर परप्रांतीय नौकाच्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याची आणि मत्स्यपालन क्षेत्रातील पायभूत सेवा सुविधा तसेच मत्स्यव्यवसाय निगडित विविध योजना अनुदान यासाठी भरीव तरतूदची आवश्यकता असल्याचेही तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रविकिरण तोरसकर प्रसिद्धी पत्रकात म्हणतात, शिंदे फडणवीस सरकारने सन २०२४-२५ साठी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला .अर्थसंकल्पामध्ये विविध लोकाभिमुख योजनांचा समावेश आहे. समाजातील विविध घटकांचा विचार करून अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे .महाराष्ट्रातील ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायाचा विचार करता भरीव आर्थिक तरतुदीची गरज होती.महाराष्ट्र सरकारने कालच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमार व्यवसायीक व मच्छीमार समाज यांच्या दीर्घ प्रलंबित मागण्यांचा विचार करून अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केली आहे. अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायासाठी खालील प्रमाणे महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत.
१) किनारपट्टीवर किनारपट्टीवर येणाऱ्या येणाऱ्या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रकल्पग्रस्त मच्छीमार कुटुंबांसाठी प्रकल्प खर्चाच्या दोन टक्के अथवा 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे
२) मासेमारी यांत्रिकी नौका डिझेल अनुदान मंजूर करताना असलेली १२० अश्वशक्ति इंजिन ची अट काढून टाकण्यात आलेली आहे. यामुळे सुमारे 85000 मच्छीमारांना फायदा होणार आहे
३) मत्स्य व्यवसायातील वर्षानुवर्षीचा अनुशेष भरून काढण्यासाठी 219 कोटींची तरतूद केली आहे
शिंदे फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या तरतुदीसाठी आम्ही माच्छिमार व्यवसायिक आणि समाजा तर्फे सरकारचे आभार मानत आहे. सदरच्या तरतुदी बरोबरच परप्रांतीय नौकाच्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी मागणी करीत आहोत. तसेच मत्स्यपालन क्षेत्रातील पायभूत सेवा सुविधा आणि मत्स्यव्यवसाय निगडित विविध योजना अनुदान यासाठी पण भरीव तरतूद व्हावी यासाठी पाठपुरावा करीत आहोत
अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसाय संदर्भात केलेल्या तरतुदी बद्दल आम्ही सरकारचे जाहीर अभिनंदन करीत आहोत तसेच इतर मागण्यासाठी सरकारने अनुकूल प्रतिसाद द्यावा असे आवाहन करीत आहोत. असे रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मालवण.