कुडाळ औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा झगमगणार

पथदिवेसाठी सुमारे ६ कोटीच्या निधीस मंजुरी

कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचा पाठपुरावा

अध्यक्ष मोहन होडावडेकर यांची माहिती

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ एम.आय.डी.सी. येथील गेली ३० वर्षाहुन अधिक जिर्ण झालेल्या पथदिव्यांच्या नुतनीकरणासाठी व नवीन पथदिवे उभारण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ६ कोटी रुपयांच्या निधीस औद्योगिक महामंडळाने मंजुरी दिली आहे.
कुडाळ औद्योगिक वसाहतीत असणारे पथदिवे बऱ्याच ठिकाणी मोडकळीस व बंद अवस्थेत असल्याने रात्री काळोखाचे साम्राज्य होते. त्यामुळे अनेक अनैक्तीक प्रकारांना वाव मिळत होता. तसेच उद्योजकांनाही असुरक्षीतता जाणवत होती. कुडाळ एम.आय.डी.सी. असोसिएशनने अलीकडेच या प्रश्नी एम. आय. डी. सी. चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बीपीन शर्मा यांची भेट घेवून लक्ष वेधुन या गंभीर समस्येबाबत कल्पना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यास अनुसरुन नुतनीकरण, दुरुस्ती व पुढील ५ वर्षाची देखभाल याकरीता ६.१८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आल्याचे असोसिएशनला कळविलेले आहे.
इंडस्ट्रीज असोसिएशनच्या मागणीस दिलेल्या सकारात्मक व तात्काळ प्रतीसदाबद्दल असोसिएशन अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी समाधान व्यक्त केले असून संबंधीत यंत्रणेचे आभार व्यक्त केले आहेत.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!