‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाला सलग दुसऱ्या वर्षी कणकवली तालुक्यामध्ये अव्वल

तालुकास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक

प्रशालेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कणकवली/मयूर ठाकूर

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये कणकवली तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या प्रशालेची जिल्हास्तरावर सलग दुसऱ्या वर्षी निवड झालेली आहे. गत वर्षी झालेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये तर या प्रशालेने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री सन्मा. श्री. दिपकभाई केसरकर यांनी नुकताच या यशाबद्दल सिंधुदुर्गनगरी येथे या प्रशालेचा जाहीर सत्कार केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये सातत्यपूर्ण १००% निकालाबरोबरचं शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे परीक्षा, ज्युनि. न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा, राष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा, BDS परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, निबंध, वादविवाद स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा यामध्ये या प्रशालेमधील मुले कायमच आघाडीवर दिसतात. क्रीडा स्पर्धांमध्ये तर राष्ट्रीय पातळीवर देखील पदक विजेते स्पर्धक प्रशालेमध्ये घडत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत प्रशालेने तालुक्यामध्ये आपलाचं दबदबा आहे हे पुनश्च एकदा सिद्ध केले आहे. प्रशालेच्या या यशाचे मुख्य श्रेय कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, हितचिंतक व दानशूर व्यक्ती यांना जाते.

क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत व शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत यांनी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!