माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंताकडून नागवे गावामध्ये गणेश चतुर्थी किट्स वाटप

दरवर्षी देण्यात येते गणेश चतुर्थी स्पेशल किट
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी गणेश चतुर्थी सणानिमित्त नागवे गावामध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधत प्रत्येक गावातील घरा- घरात सात वस्तूच किट दिल आहे. त्यामध्ये साखर,रवा,तेल, मैदा,गुळ,धूप,कापूर अगरबत्ती अशा प्रकारच्या वस्तू एकत्र किट बनवून घरा घरात दिल्या आहेत. त्यामुळे गावातील लोकांनी समाधान व्यक्त करत गोट्या सावंत व संजना सावंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.कारण गणेश चतुर्थी सारख्या मोठ्या सणाला लावलेला हातभार खूप मोलाचा मानला जातो. कारण या सात आठ वस्तू सणासुदीच्या काळात देऊन खूप मोठा हातभार लावल्या सारखा आहे. त्यामुळे गावातील लोकांनी मनापासून समाधान व्यक्त करत गोट्या सावंत व संजना सावंत यांना धन्यवाद दिले आहेत. या किट्स चे वाटप ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत व भाजपा कार्यकर्त्यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी