जि.प.खारेपाटण(ठाकरे -शिवसेना )विभाग संपर्क प्रमुख सतीश गुरव यांज कडून खारेपाटण केंद्र शाळेला २०,००० रुपये किंमतीच्या वह्या वाटप

खारेपाटण संभाजीनगर,गुरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जि.प.खारेपाटण विभाग संपर्क प्रमुख श्री सतीश कृष्णा गुरव यांनी कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यासाठी सुमारे २०,०००/- रुपये किमतीच्या मोफत वह्या वाटप केल्या आहेत.
खारेपाटण केंद्र शाळेत संपन्न झालेल्या या मोफत वह्या वाटपच्या कार्यक्रमाला खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख निखिल गुरव,किरण गुरव,शिवसेना युवा कार्यकर्ते तेजस राऊत,रमेश गुरव, भूषण कोळसुलकर,संतोष तुरळकर दिनेश खांडेकर आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण केंद्र शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तर त्यांचे बंधू श्री निखिल गुरव यांच्या शुभहस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!