नाटळ मतदारसंघातील जनतेला वचननाम्यामधून दिलेली वचने निवडून आल्यानंतर नियोजनबद्ध कालावधीत पूर्ण करणार!

नाटळ जि. प. मतदार संघाचे उमेदवार उत्तम लोके यांची माहिती

धरणाच्या कामाचा जमीन मालकांना मोबदला विना दलाली मिळून देणार

नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे धडाडीचे उमेदवार उत्तम लोके यांनी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांवरती गेले अनेक दिवस प्रचारादरम्यान आवाज उठवत असताना आता जनतेसाठी निवडून आल्यानंतर काय करणार याबाबतचा वचननामा त्यांनी जाहीर केला आहे. या वचननाम्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला असून जनतेच्या समस्या सोडवण्याबरोबरच मूलभूत प्रश्न या वचननामाच्या माध्यमातून त्यांनी मांडले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये या वचननाम्या ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या वचननाम्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी मूलभूत प्रश्न मांडत असताना पाण्याचे योग्य नियोजन करून मतदार संघातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपाविणे, रस्ते व सांडपाण्याची व्यवस्था करणे, सर्व सुविधांनी युक्त सार्वजनिक मंगल कार्यालय बनवणे, गाव वाढीसाठी जमीन मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, निराधार आणि वृध्द लोकांसाठी पगार चालू करण्यासाठी प्रयत्न करणार, लहान व मोठ्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि सर्व सुविधांनी युक्त असे ग्राऊंड बनविणे, ग्रामपंचायत मार्फत लघु उद्योगांना चालना देऊन गावात रोजगार निर्मीती करणे,महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन महिलांचे सक्षमीकरण करणे, शेतकऱ्याला विकासाचा बिंदू ठेऊन कृषीविषयक योजना गावात राबविणे, पक्के शेतरस्ते बनविणे, जुन्या घरकुलांचे थकलेली बीले काढण्यासाठी प्रयत्न करणे व नविन घरकुले आणि जागा मंजूर करून घेणे, गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करणे, भुमिहीन मजुरांना महिला बचत गटामार्फत वर्षभर रोजगार निर्मीती करण्यासाठी प्रयत्न करणार, गावातील शाळा सुसज्ज आणि उच्च दर्जाच्या बनवणार, संपुर्ण गावात घर तिथे नळ योजना राबविणार, जलसंधारणाच्या कामाला गती देऊन गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करणार, दलीत वस्तीच्या सुधारणेसाठी शासकीय योजनांची योग्य पद्धतीने अमलबजावनी करुन विकास करणार,गावात प्रशस्त वाचनालय आणि स्पर्धा परिक्षा केंद्र उभारणार, गावात कायमस्वरुपी शांतता राहवी यासाठी ज्येष्ठ नागरिकांची आणि तरुणांची समिती बनवून गावातील तंटा मिटवणार, दर महिन्याला गावात स्वच्छता अभियान राबवून गावाची स्वच्छता करणार, गावातील सर्व मंदिराची डागडुजी करून मंदिराचे सुशोभीकरण करणार, ग्रामपंचायतचा व्यवहार पारदर्शक करून आलेला निधी व खर्च झालेला निधी सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बोर्डावर दाखविण्यात येईल. रखडलेले धरण लवकरात लवकर पूर्ण करणे, धरणग्रस्त जनतेचा अडकलेला मोबदला लवकरात लवकर विना दलाली मिळवून देणे, नदीतला गाळ काढून पाणीटंचाईचा विषय पूर्णस्वात नेणे हे वचन वचननाम्या मधून उत्तम लोके यांनी मतदारसंघातील जनतेला दिले आहे. ही सर्व कामे येत्या काळात निवडून आल्यानंतर काही दिवसांमध्ये पूर्ण केली जातील असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उत्तम लोके यांचा वचननामा साध्या मतदारांच्या पसंतीस उतरत आहे.

error: Content is protected !!