खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात ठाकरे सेनेला खिंडार

ठाकरे सेनेच्या दोन शाखाप्रमुखांसह साळीस्ते व शेर्पे येथील 28 उबाठा कार्यकर्त्याचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश

अस्मिता गिडाळे/खारेपाटण

जिल्हापरिषद व पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी आज दि. 1फेब्रुवारी 2026रोजी सायंकाळी खारेपाटण येथे बैठक घेऊन पंचायत समितीचे महायुतीतील शिवसेना शिंदे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व तळेरे पंचायत समिती चे भाजपा चे अधिकृत उमेदवार राजेश जाधव यांच्या प्रचारार्थ उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून आपल्या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहूमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.यावेळेस उबाठा सेनेचे साळीस्ते येथील शाखा प्रमुख -वैभव कांबळे व शेर्पे येथील उबाठा सेनेचे शाखा प्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य -भूषण शेलार यांच्यासह,साळीस्ते येथील अरुण कांबळे,ऋतीकेश कांबळे,चेतन कांबळे तर शेर्पे येथील भूमी शेलार,
नामदेव कदम, शोभा कदम, सुनंदा तेली, वासुदेव पवार, सुनंदा पांचाळ, नारायन पांचाळ, निर्मला पांचाळ, सुलोचना पांचाळ, दिपक पांचाळ, सचिन पांचाळ, कल्पना पांचाळ, वैशाली पांचाळ, सुगंधा पवार, पांडुरंग पांचाळ, सविता पवार, वामन तेली, जयश्री तेली, मोरेश्वर पवार, वसंत पांचाळ, ज्ञानदेव पांचाळ, महेश पवार, तुकाराम तेली, आदि कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
यावेळेस मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, खारेपाटण जि.प.च्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार प्राची इस्वलकर,माजी जि.प.सभापती बाळा जठार, खारेपाटण पं.सं.उमेदवार गुरू शिंदे,तळेरे पं.स. उमेदवार राजेश जाधव,शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश गुरव, रमाकांत राऊत, सूर्यकांत भालेकर,मंगेश कांबळे, निशा गुरव, तृप्ती माळवदे याच्यासह महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!