सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्याचा मतदारांनी आता निर्णय घेतलाय!

कळसुली जि. प. च्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी वैभव नाईक यांचे प्रतिपादन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची उपस्थिती

कळसुली जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची आमडोसकर यांच्या प्रचाराचा आज वागदे मध्ये मोठ्या गर्दीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे प्रमुख उपस्थित होते. गावागावांमधून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठी लाट आली असून या विरोधात सत्ताधाऱ्यांना घरी बसवण्याकरता आता मतदारसंघ झाल्याचा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केला. तसेच कळसुली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्राची आमडोसकर, रुपेश आमडोसकर, नयन गावडे, राजू राणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!