हिंदूंनी एकसंध राहणे हीच खरी देशाची शक्ती!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
श्री दत्तक्षेत्र आशियेमठातील अतिरुद्र स्वाहाकार सोहळ्याला मंत्री राणेंची भेट
हिंदुंचा कोणताही कार्यक्रम असला तरी त्यात हिंदू बांधवांनी सहभागी झाले पाहिजे. हिंदू धर्माबद्दल प्रत्येक हिंदूला गर्व असला पाहिजे. हिंदुंनी एकसंध असणे ही देशाची खरी शक्ती आहे. श्री दत्तक्षेत्र आशियेमठ दत्तमंदिरात अतिरुद्र स्वाहाकाराचा पवित्र धार्मिक कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
श्री दत्तक्षेत्र आशियेमठ येथील पुरातन दत्तमंदिरात अतिरुद्र स्वाहाकार सुरू आहे. याला कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे रविवारी रात्री भेट दिली. याप्रसंगी मंत्री राणे बोलत होते. श्रुंगेरी मठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती संदीप टेंकशे, श्रुंगेरी पिठाचे प्रतिनिधी वेदमूर्ती निरंजन बापट, अतिरुद्र स्वाहाकार मुख्य आचार्य प्रसाद देवस्थळी, आशिये सरपंच महेश गुरव, विलास खानोलकर, पांडुरंग बाणे, सुनिल बाणे, यशवंत बाणे, मिलिंद करंबेळकर, सुहास खानोलकर, दिवाकर बाणे, संजय बाणे, देवदास बाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, श्री दत्तक्षेत्र आशियेमठातील पुरातन दत्तमंदिरात अतिरुद्र स्वाहाकाराचे पवित्र कार्य घडले असून या कार्याचे सर्व श्रेय ग्रामस्थांचे आहे. अतिरुद्र स्वाहाकार सोहळ्याबद्दल मला महेश गुरव यांनी सांगितले. त्यामुळे या सोहळ्याला मी उपस्थिती दर्शवली आहे. हा सोहळा सहज होत नाही, तर देवदेवतांचे आशीर्वाद असावे लागतात. हा सोहळ्यात कुठले हे अडथळे न येता ग्रामस्थ व भक्तांच्या सहकार्यातून निर्विघ्नपणे पार पडत आहे. महनीय व्यक्तींच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम शक्य होतात. त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. हिंदू बांधवांना आपल्या धर्माबद्दल गर्व असला पाहिजे. हिंदुंनी एकत्र येऊन अशाप्रकारचे कार्यक्रम केले पाहिजे. हे कार्यक्रम करताना राजकारण आणले नाही पाहिजे. हिंदुंनी एकत्र येणे ही देशाची खरी शक्ती आहे. हिंदुत्व हा माझा बाणा असून मी देशाला हिंदू राष्ट्र म्हणतो तेव्हा काही पत्रकार मित्र मला विचारतात आपला देश संविधानावर चालतो, हे खरे असले तरी हिंदू राष्ट्राचा मी एक पाईक आहे. माझ्या मतदारसंघातल्या आशिये गावामध्ये अतिरुद्र स्वाकारासारखे उत्सव होतात. त्याचा मला अभिमान आहे. माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी एक हिंदू आहे, हे नेहमी लिहिले असते. त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. हिंदू म्हणून आपली ओळख ठेवणे हे हिंदूंचे परम कर्तव्य आहे. यावेळी मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचा वेदमूर्ती संदीप टेंकशे यांच्या सन्मान केला. आशिये दत्तमंदिर कमिटीच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.





