मराठा नेते मनोज जरांगे-पाटील मालवण मध्ये दाखल

सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण मध्ये केले स्वागत

मराठा नेते मनोज जरांगे-पाटील आज मालवण मध्ये दाखल. सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण येथे भेट घेत केले स्वागत. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील पाहणी करणार आहेत. त्यानंतर कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन ते आपले व्यक्तव्य स्पष्ट करणार आहेत.
यावेळी सतीश सावंत, सुशांत नाईक, संजय सावंत, संतोष सावंत, राजू रावराणे, पिंटू पटेल, पवन भोगले, मिलिंद अहिर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!