करंजे गावाच्या विकासाचे मुद्दे मार्गी लावण्यासाठी झटून काम करणार!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांच्या प्रचाराचा करंजे मध्ये जोरदार शुभारंभ

हरकुळ बु. जिल्हा परिषद मतदार संघामधून मला उमेदवारी मिळाल्यानंतर या भागातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर जे प्रेम दाखवत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला यात करंजे गावच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे. केवळ प्रचारासाठी नव्हे तर राणे साहेबांचा आदेश मानून मतदार संघातील सर्वच कार्यकर्ते झटून काम करत आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावाने मला प्रचारावेळी दिलेली साथ ही माझ्या व माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवारांच्या विजयला शिखरावर नेऊन पोचवणारी ठरणार आहे. हा खऱ्या अर्थाने मला मिळालेला जनतेचा आशीर्वाद आहे. असे प्रतिपादन हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मनोज रावराणे यांनी केले. करंजे मध्ये श्री रावराणे यांच्या प्रचाराचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी करंजे सरपंच सपना मेस्त्री,उपसरपंच गजानन करंजेकर,माजी सरपंच मंगेश तळगावकर,गणेश तळगावकर,बूथ अध्यक्ष तुकाराम परब,बूथ अध्यक्ष विठ्ठल नारकर,राजेश परब,राजन चिंदरकर, कांता चिंदरकर,लाडू परब,मंगेश राणे,अनंत घोणे,योगेश दळवी,बाळा करंजेकर, बाबू बागवे,आप्पा सातवसे,दर्शन सावंत,अक्षय सावंत,अनंत सातवसे,ग्रामपंचाय सदस्य रेणुका सातवसे,राजू बागवे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!