विकास कामांच्या निधी बाबत निश्चिंत राहा;तिजोरीच्या चाव्याच माझ्याकडे-पालकमंत्री नितेश राणे

खारेपाटण-तळेरे पं.स चे उमेदवार राजेश जाधव व गुरुप्रसाद शिंदे यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा
खारेपाटण येथे महायुतीच्या सभेत पालकमंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती ची सभा संपन्न झाली. “आज खारेपाटण येथे ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी सभा घेतली की विजय आपलाच असतो असा शुभ संकेत असतो.”आज जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकतर्फी असून तसा संकेत जिल्ह्यातील जनतेने मागील खासदार व आमदारकीच्या निवडणुकीत दिले आहेत. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास महायुती करणार आहे. झालेल्या निवडणूका पाहिल्यावर जनतेचे स्पष्ट बहुमत महायुतीला दिला आहे.यामुळेच आमचे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐवढे उमेदवार बिनविरोध आले आहेत.विरोधक नाउमेद झाले आहेत. ते निवडून आल्यास निधी कुठून आणणार कारण सर्व सत्ता आमच्याकडे आहेत. खारेपाटण विभाग नेहमीच एक नंबर असतो सर्व सत्ता केंद्र आपल्याकडे असल्याने प्रत्येक गावात शंभर टक्के विकास करण्याचा विश्वास देतो असे जिल्हाचे पालकमंत्री व मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यानी सांगितले. ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे खारेपाटण पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे आणि तळेरे पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार राजेश जाधव यांच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे बोलत होते.
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे घेण्यात आलेल्या महायुती च्या सभेत सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेचे शाखा प्रमुख भूषण शेलार व वैभव कांबळे यांच्यासह उबाठाच्या 28 कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर पक्षप्रवेश केला.
यावेळेस महायुती भाजपा कणकवली मंडळाध्यक्ष दिलीप तळेकर,शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव,माजी जि.प. सभापती रवींद्र जठार,रत्नप्रभा वळंजू, उमेदवार गुरुप्रसाद शिंदे,राजेश जाधव, खारेपाटण जि. प. मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या प्राची इस्वलकर,सूर्यकांत भालेकर, रमाकांत राऊत,उपसरपंच -महेंद्र गुरव,रवी शेट्ये,तृप्ती माळवदे,निशा गुरव, रत्नप्रभा वळंजू,उज्वला चिके,मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे, अस्ताली पवार, गौरी शिंदे, आरती गाठे, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील जनतेनी स्पष्ट संकेत दिलेत की जर आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल प्रगती पथावर न्यायचा असेल तर ते फक्त नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच करू शकतं हे जनतेने दाखवून दिलेलं आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमचे महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत ते जनतेनेआमच्यावर असलेल्या विश्वासामुळे आणि विकास कामाच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन आम्हाला जनता साथ देते आमच्या सोबत ठामपणे उभी आहे. असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात अनेक इच्छुक उमेदवार होते पण राणे साहेब तसेच पक्षाचा शब्द न डावलता पक्षाचा शब्द अंतिम मानून ज्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यांचे देखील आभार नितेश राणे यांनी या सभेत व्यक्त केले. खारेपाटण पंचायत समिती मधून रमाकांत राऊत,सूर्यकांत भालेकर, उज्वला चिके यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले व पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यासाठी त्यांचे देखील विशेष आभार या सभेत राणे यांनी मानले.आम्ही राणे कधी डबल गेम करत नाही आम्ही उन्नीस बीस मध्ये नाही जिथे असतो तिथे 100%प्रामाणिक असतो.आणि म्हणूनच आम्हांला राणे म्हणतात.ज्याला आम्ही अधिकृत शिवसेना व कमळ निशाणी वर उमेदवारी दिली आहे त्याच्यासाठी आम्ही मतदान मागणार आणि त्यालाच आम्ही निवडून आणणार.खारेपाटण मध्ये जे अपक्ष उमेदवार नागरिकांमध्ये जो व्हाट्सअप स्टेट्स ठेवून मी राणे साहेबांचा आहे असा संभ्रम निर्माण करून वातावरण गढूळ करण्याचा जो प्रयत्न करतायत ते चांगल नाही. जर राणे साहेबांचा होतास तर मग राणे साहेबांशी व त्यांच्या पक्षांशी बंडखोरी का केली. असा प्रश्न देखील राणे साहेबानी उपस्थित केला.तळेरे पंचायत समिती मधून आमच्या भाजपाचे राजेश जाधव व शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत यांच्याशिवाय आमचं कोणालाही समर्थन नाही असे स्पष्ट मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.विरोधी पक्षातले जर जास्तच कोणी जोरजबरदस्ती करत असेल तर त्यांना सोबत असताना मला फोन लावून द्या आणि त्यांना सांगा नितेश रानेंशी बोल बाबा… अश्या प्रकारचा सल्ला यावेळी नितेश राणे नी दिला.त्यामुळे महायुती च्या सर्वच लोकांना सांगू इच्छितो की आमच्या या अधिकृत उमेदवारांना भरघोस मताधिक्याने मत देऊन निवडून आणण्याचे आवाहन नितेश राणेनी यावेळी केले.तसेच विकास कामाच्या निधीची काहीही चिंता करू नका, तिजोरीच्या चाव्या चं माझ्या कडे आहे जाणार कुठे, उबाठा ला मतदान करून ते एक रुपयाचा तरी निधी देऊ शकतात का?कुठून देणार ते?कोणती सत्ता आहे त्यांच्याकडे?असा टोला देखील राणे यांनी यावेळी लगावला.त्यामुळे सर्व मतदारांना नागरिकांना ग्रामस्थांना तुम्ही निश्चित राहा तुम्ही जी जी विकासकामांची यादी माझ्याकडे घेऊन याल ती सर्व कामे 100%पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूर्णपणे माझी असेल असे आश्वासन राणे यांनी दिले.





