सतीश सावंत यांची ताकद उद्धव ठाकरेंना कळलीच नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचे उद्गार

सतीश सावंत यांचा भाजपामध्ये प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले आहे. रविवारी कणकवलीतील हरकुळ खुर्द येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ झाली आहे.
​यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर,मिलिंद मेस्त्री ,उमेदवार मनोज रावराणे, बबलू सावंत,सर्वेश दळवी यांसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.
​सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात २०१९ विधानसभा निवडणुकीत प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये परतल्याने “घरवापसी की नवी खेळी?” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.
​सतीश सावंत हे केवळ नेते नसून ठाकरे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,भिरवंडे सरपंच नितीन सावंत,हरकुळ खुर्द सरपंच आनंद ठाकूर, बेनी डिसोझा यांसारख्या महत्त्वाच्या मोहऱ्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाची स्थानिक फळी खिळखिळी झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच झालेली ही गळती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
यावेळी भाजपात केलेल्या प्रवेश कार्यकर्त्यांमध्ये हरकुळ खुर्द सोसायटी व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर,अर्चना घाडीगावकर,सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर,ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत ,माजी सरपंच संदीप रासम,राजेंद्र ढवण,सहदेव पोकळे,नागवे माजी सरपंच बाळा सावंत,चंद्रकांत सावंत,अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील १५० प्रमुख कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे.

error: Content is protected !!