कुडाळ न. प. कडून मालमत्ता कर (घरपट्टी) भरण्याचे आवाहन

नगरपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर (घरपट्टी) भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत असून, अद्याप ज्या मालमत्ता धारकांनी घरपट्टी भरलेली नाही, त्यांनी आपला कर त्वरित भरणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर घरपट्टी भरावी असे आवाहन कुडाळ नगर पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत थकबाकीदार मालमत्ताधारकांना नियमानुसार जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. तरी संबंधित थकबाकीदारांनी तात्काळ थकित व चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणा करावा. अन्यथा महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कडक कारवाई / जप्तीची कार्यवाही करण्यात येईल. तरी घरपट्टीचा भरणा तात्काळ करुन होणारी जप्तीची कारवाही टाळावी. तसेच मालमत्ता कर भरण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन किंवा वॉर्ड वसुली लिपिक यांचेकडे मालमत्ता कर भरणा करता येईल. मुदतीनंतर कर न भरल्यास नियमांनुसार दंड व व्याज आकारण्यात येईल, याची मालमत्ता धारकांनी नोंद घ्यावी.
सर्व मालमत्ता धारकांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!