चिंदर पंचायत समिती प्रभारी पदी प्रकाश मेस्त्री

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी जाहीर केली निवड
आचरा–अर्जुन बापर्डेकर
भारतीय जनता पार्टी संघटनात्मक तालुकास्तरीय निवडी काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी बाकी असलेल्या निवडी जाहीर होत आहेत. चिंदर पंचायत समिती प्रभारी रिक्त असलेल्या पदावर चिंदर येथील उद्योजक प्रकाश दिनकर मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उद्योजक प्रकाश मेस्त्री यांची निवड जाहीर केली आहे. प्रकाश मेस्त्री यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.