कणकवली नगरपंचायत तर्फे पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा

सहभागी होण्याचे करण्यात आले आहे आवाहन

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ही दिनांक 7 सप्टेंबर ते दिनांक 9 सप्टेंबर सायंकाळी 4 वाजे पर्यंत असून या साठी प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 5000/- द्वितीय पारितोषिक रक्कम रुपये 3000/- व तृतीय पारितोषिक रक्कम रुपये 2000/- तसेच 5 उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 500/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा कणकवली शहर मर्यादित असून स्पर्धकांनी आपले फोटो अथवा रिल कणकवली नगरपंचायतच्या अधिकृत facebook पेज Kankavali Nagarpanchayat किंवा instagram पेज kankavalinp ला tag करावा, तसेच खालील ई टॅगचा वापर करणे अनिवार्य आहे.

majhivasundhara, #MissionLife, #swachhsurvekshan2024, #3R, #Kankavalinagarpanchayat ही स्पर्धा विनामूल्य असून जास्तीत जास्त गणेश भक्तांनी ह्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांनी सर्व नागरिकांना केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या फेसबुक किंवा instagram पेज ला फॉलो व मेसेज करा किंवा नगरपंचायतशी संपर्क साधावा.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!