कणकवली येथील व्यापारी शांताराम म्हापसेकर यांचे निधन

कणकवली बाजारपेठ येथील शांताराम जगन्नाथ म्हापसेकर ( वय ९२ ) यांचे शनिवार दि.३१ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. कणकवली बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून सायकल विक्रीचा व्यवसाय करत होते. कणकवली शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून ते लोक परिचित होते.

त्यांच्या पश्चात ५ मुलगे , सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत शोकांकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!