सिंधुरत्न स्पोर्ट्स अकादमी च्या खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
जगद्विख्यात हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडादिंन म्हणून देशभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तांबे भवन हॉल, कलमठ येथील सिंधुरत्न स्पोर्ट्स अकादमी चे ट्रेनिंग सेंटर वर प्रतिवर्षी प्रमाणे खेळाडू , पालक , प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्रीडादीन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कु. दुर्वा पवार हिने मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. मेजर ध्यानचंद यांच्या प्रमाणे आपण शिस्त , निष्ठा , दृढनिश्चय व समर्पण या चतुःसुत्री चा अवलंब केला तर जीवनात व खेळात यश हे निश्चित असल्याचे प्रतिपादन अकादमीचे अध्यक्ष श्री भालचंद्र कुळकर्णी यांनी केले. यावेळी प्रा. जयश्री कसालकर बांदेकर , कोच श्री. आविराज खांडेकर कु.बालदत्त सावंत तसेच मा. गायकवाड , मा. मुळये, सौ. नम्रता राणे, सौ. भूमिका सुतार आदि पालक उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी