जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत वेदांत वायंगणकर व सार्थक वायंगणकरचे यश

विभागीय स्पर्धेसाठी २ खेळाडूंची निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील १२ वी सायन्सचा खेळाडू वेदांत वायंगणकर याने १९ वर्षे वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला तर १४ वर्षे वयोगटात सार्थक वायंगणकर इ.६ वी याने तृतीय क्रमांक पटकावला आहे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा कुडाळ हायस्कूल येथे पार पडली. या दोन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

या यशस्वी खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रा. विनायक पाताडे, अवधूत कानकेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा. दिवाकर पवार व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याव्यक्ष संजय पाताडे, संकुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व इतर सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच प्राचार्या बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!