शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा व रक्तदान शिबीर

शिवसेना – युवासेना देवगड तालुक्याच्या वतीने आयोजन

युवासेना चषक भजन स्पर्धा – 2024

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना-युवासेना देवगड तालुका आयोजित भव्य भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा देवगड तालुका मर्यादित असणार आहे. सोमवार दि. 29 जुलै 2024 रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ- इंद्रप्रस्थ हॉल, हॉटेल डायमंडच्या मागे, सातपायरी, देवगड. युवासेना चषक भजन स्पर्धा-2024 या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये १५,१११ व सन्मान चिन्ह. द्वितीय क्रमांकास रोख रुपये १०,१११ व सन्मान चिन्ह. तृतीय क्रमांकास ५,१११ व सन्मान चिन्ह. उत्तेजनार्थ रोख रुपये २,१११ व सन्मान चिन्ह अशी बक्षीस ठेवण्यात आली असून तबला, पखवाज, तालरक्षक, कोरस, शिस्तबद्ध संघ यासाठी वैयक्तिक पारितोषिक रोख रुपये व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
नियम व अटी पुढील प्रमाणे

  1. भजन स्पर्धेचा कालावधी ३० मिनिटे राहील.
  2. प्रथम येणाऱ्या १५ संघांना प्रवेश देण्यात येईल.
  3. सादरीकरणात प्रार्थना, जय जय राम कृष्ण हरी, रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग, अभंग, गौळण, आणि उद्धव साहेब यांच्यावर्ती काव्य असावे.
  4. भजन मंडळात कमीत कमी १० सदस्य असावेत.
  5. एका स्पर्धकाने एकाच भजन मंडळात सहभाग घ्यावा.
  6. तबला, पखवाज, पेटी, टाळ हीच वाद्य असावीत. इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करता येणार नाही.
  7. उद्धव ठाकरेंचे काव्य स्वरचित असावे. पिक्चर किंवा अल्बमची चाल किंवा गाणं नसावे.
  8. भजन मंडळांनी दिलेल्या वेळेच्या आधी अर्धा तास कार्यक्रम स्थळी हजर राहावे.
  9. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  10. कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राहतील.
    अधिक माहितीसाठी संपर्क
    *गणेश गांवकर – ९७७३२७२३३८
    या स्पर्धेत जास्तीत जास्त भजन मंडलांनी सहभाग घ्यावा असे आव्हाहन शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम,जयेश नर, महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगांवकर, युवासेना तालुका प्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी यांनी केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!