फार्मसी विद्यार्थी व असोसिएशन कडुन संविता आश्रमात वस्तू वाटप

पणदुर येथील संविता आश्रमातील अनाथ बांधवांना श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यमान विद्यार्थी व माजी विद्यार्थी असोसिएशन कडुन बहुपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी, अनाथांना भेटुन त्यांच्याशी हितगुज साधले. तसेच आश्रमाच्या सेवाकार्याची माहिती तेथील व्यवस्थापक बापु सावंत यांच्या कडून जाणून घेतली.
त्याआधी जीवन आनंद संस्थेच्या किनळोस येथील सक्षम आश्रमाच्या शेती व कुक्कुटपालन प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक श्री. कामत यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मडुरकर, सदस्य प्रकाश चव्हाण, सौ.हर्षदा ठाकुर व सहाय्यक प्राध्यापक गणु गावडे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका सौ. नुतन परब व प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचा, विद्यार्थ्यांत अनाथ बांधवांविषयी जागृकता व जबाबदारीची भावना निर्माण करणे हा हेतू होता. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.





