महापुरुष मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

१९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

कणकवली शहरातील महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून, या कार्यालयाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी व अंगणवाडी सेविका लक्ष्मी मेनकुदळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या रौप्य महोत्सवानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक विधी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष राजू पारकर, खजिनदार मंदार सापळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, निवृत्ती धडाम, राजू मानकर, सुशील पारकर, चेतन अंधारी, नंदू ओटवकर, राजा राजाध्यक्ष, संदीप अंधारी, पांडू डिचोलकर, दत्ता तोरस्कर, प्रद्युम मुंज, निखिल घेवारी, सोहम वाळके, रुद्र सापळे, चेतन मुंज, गौरेश सापळे, प्रथमेश चव्हाण, सुरज ओरसकर,रोशन मांगले, स्वप्निल मेनकुदळे,तसेच मंडळातील महिला कार्यकर्त्या स्नेहा अंधारी, शिल्पा मानकर, वंदना अंधारी, अँड.राधिका मिशाळ, मानसी सापळे, धनश्री चव्हाण,मनीषा सापळे, सान्वी अंधारी, ऋचा सापळे, सावी अंधारी, शीतल सापळे, वैशाली काणेकर, सानिका सापळे, आरती मेनकुदळे, सृष्टी अंधारी, देविका चव्हाण, सलोनी अंधारी, दुर्वा मानकर, पल्लवी मेनकुदळे, अंशु सापळे यांच्यासह तुषार मेनकुदळे, दुर्वेश सापळे, अथर्व अंधारी, पारस सापळे, भौमिक अंधारी, राणे गुरुजी आदी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यापारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!