जि. प. च्या सर्व जागा जिंकणार ; नारायण राणेंना 75 व्या वाढदिवसाची विजयगिफ्ट देणार!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
धरून -बांधून उमेदवार उभे करणाऱ्या ठाकरे सेनेला जनता धडा शिकवेल
वैभववाडीत महायुतीच्या सभेत नाम. नितेश राणे यांचा ठाकरे शिवसेनेवर जोरदार हल्ला
कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 27 वर्ष जिल्हा परिषद निवडणूक आपण जिंकत आलो आहोत.होऊ घातलेल्या जि. प. च्या निवडणुकीत 50 पैकी 50 जागा जिंकून आदरणीय नारायण राणे साहेबांना 75 व्या वाढदिवसाला विजयाच गिप्ट देवूया. व आपण सर्वांनी वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करूया असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी येथे केले आहे. जिल्ह्यात निवडणुकीसाठी उबाठा सेनेला धरून बांधून उमेदवार उभे करण्याची वेळ आली आहे. असे उमेदवार जनतेला न्याय काय देणार. त्यामुळेच ते रणांगणातून माघार घेत आहेत. अशी टीकाही नामदार नितेश राणे यांनी यावेळी केली.
वैभववाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक महायुतीची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेच्या प्रसंगी अनेक गावातील उभाटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश केला. सर्व प्रवेश करणाऱ्यांचे नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी नितेश राणे म्हणाले, वैभववाडी तालुका हा राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे. महायुतीचे उमेदवार हे राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना 7 तारखेला मतदान रुपी आशीर्वाद द्या. आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन याप्रसंगी नितेश राणे यांनी केले.
यावेळी ते म्हणाले, कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात तब्बल साडेतीन हजार करोडची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या मार्गाचे भूसंपादन होईल. व 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्या. शंभर टक्के विकासाची जबाबदारी ही माझी राहील असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. मतदारांचा विश्वास हा महायुती सरकारवर आहे. त्यामुळेच भाजपात प्रवेशाचा कल वाढत आहे असे सांगितले. गेले दहा वर्ष तुमचा आमदार विरोधी बाकावर होता. परंतु आता मंत्री आहे. त्यामुळे मागील दहा वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असा शब्दही त्यांनी याप्रसंगी मतदारांना दिला.
यावेळी सुधीर नकाशे यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षाच्या वतीने नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय सावंत यांनी मानले.
यावेळी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, नासिर काझी, शारदा कांबळे, प्रमोद रावराणे, स्नेहलता चोरगे प्राची तावडे, श्रद्धा रावराणे व उमेदवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला, युवक उपस्थित होते.





