वाई-सातारा येथील स्पर्धेत रघुकुल स्वरविहारच्या तीन शिष्या चमकल्या

शास्त्रीय गायन स्पर्धेत पल्लवी पिळणकर प्रथम
धर्मपुरी वाई – सातारा येथे पार पडलेल्या ३९ व्या श्री कृष्णाबाई संस्थान घाट राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडी येथील रघुकुल स्वरविहारची शिष्या कु. पल्लवी पिळणकर हि विजेती ठरली. तर कु. श्रुती सावंत हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सुगम संगीत स्पर्धेत कु. पूर्वा धाकोरकर हिला दुसरा क्रमांक मिळाला.
धर्मपुरी वाई सातारा येथे ही स्पर्धा पार पडली. या शास्त्रीय गायन स्पर्धेत २१ स्पर्धक होते. त्यात “रघुकुल स्वरविहार” च्या कु. पल्लवी पिळणकर हिने प्रथम क्रमांक तर कु. श्रुती सावंत हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तसेच, सुगम संगीत गायन स्पर्धेत 33 स्पर्धक होते. या स्पर्धेत कु. पूर्वा धाकोरकर हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. पुणे, सातारा, गुहागर येथून स्पर्धकांचा सहभाग होता. या दोन्ही स्पर्धेचे परीक्षण अंगद गायकवाड आणि श्रीमती. राधा भट यांनी केले होते. राघूकुल स्वरविहार च्या या तिन्ही शिष्यांचे अभिनंदन होत आहे.





