द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड 2026 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजन
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘द स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड ’ अंतर्गत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा कणकवली तालुकास्तरीय उद्घाटन समारंभ कणकवली नं. १ शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.तसेच कणकवली तालुक्यातील आठ केंद्रावर मान्यवारांच्या हस्ते सराव परीक्षेचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात कणकवली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर गवस यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार श्री. प्रकाशभाई दळवी, तसेच जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण वळवी उपस्थित होते.
याशिवाय कणकवली तालुका केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष, कणकवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय पवार, महाराष्ट्र राज्य पदवीधर केंद्रप्रमुख सभा राज्य नेते राणे सर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे श्री. किशोर कदम, केंद्रप्रमुख विजय भोगले, शांताराम सावंत, महाले सर, चंद्रकांत तेली, बागवे सर, माळगवे सर, पारकर सर, राधाकृष्ण गुरव, संघाच्या महिला जिल्हाप्रमुख समिधा वारंग मॅडम, प्रतीक्षा तावडे, सुकन्या मुंडले, कणकवली नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका सायली गुरव मॅडम, अखिल संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पावसकर व तालुका सचिव सत्यवान केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर गवस यांनी संघटनेच्या या उपक्रमाचे तसेच परीक्षेसाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म व काटेकोर नियोजनाचे विशेष कौतुक केले. तर श्री. प्रकाश दळवी यांनी उपक्रमास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
कणकवली तालुक्यातील आठही परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थी व शिक्षक यांची अल्पोपहार व भोजन व्यवस्था करण्यात आली तसेच सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री रामचंद्र नारकर साहेब यांचे वतीने तालुक्यातील सर्व परीक्षार्थींसाठी खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रभाकर पावसकर व सूत्रसंचालन श्री. रमेश डोईफोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. जाकीर शेख यांनी केले.





