पाट हायस्कूल ठरली हरित सेनेची अतिउत्कृष्ट शाळा

हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांना सन्मानपत्र प्रदान
एस. एल. देसाई विद्यालय पाट या शाळेची हरित सेना अति उत्कृष्ट शाळा म्हणून निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे वनविभागाचे वनाधिकारी राजेंद्र मगदूम यानी हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांना यासाठी सन्मानपत्र प्रदान केले .
एस .एल .देसाई विद्यालय पाट येथे सर्वच उपक्रम नाविन्यपूर्ण राबविले जातात. हरित सेनेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये पक्षी निरीक्षण, वृक्ष लागवड, एक पेड मा के नाम, कांदळवन सफारी, विविध वनदिन साजरे करून मुलांमध्ये जागृती केली जाते. महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पाट हायस्कूल मध्ये मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. यावर्षी सर्पमित्र भरत जगताप यांनीही साप समज गैरसमज या विषयावर सुंदर व्याख्यान दिले होते.
विद्यालयामध्ये पाणथळ क्लब इको क्लब वनरक्षक क्लब असे विविध गट स्थापन करून त्या मार्फत कार्य केले जाते.
परसबाग लागवड, वनौषधीची ओळख, रानभाजी मेळावा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेसाठी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण अधिकारी सिंधुदुर्गचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदूम, सहाय्यक वनरक्षक वर्षा कोळेकर, वनक्षेत्रपाल लक्ष्मण पोद्दार, वनपाल श्रेया परब, त्याचप्रमाणे वनरक्षक आधी उपस्थित होते.
सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक हंजनकर सर तसेच पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी संदीप साळसकर आणि या उपक्रमातील सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे.





