पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर

युवा सेनेच्या वतीने आयोजन

सहभागी होण्याचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचे आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी हरकुळ विभागीय कार्यालयामध्ये युवासेना कणकवली तालुकातर्फे 28 जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर शिवसेना नेते सतीश सावंत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अतुल रावराणे आणि शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी सर्व रक्तदाते ,शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी हजर राहावे असे आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केले आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!