बागायत येथील बीएसएनएल टाॅवर नाॅटरिचेबल

महिनाभर टॉवर बंद अवस्थेत – ग्राहक आक्रमक
आमदार लक्ष देतील का ?
मालवण तालुक्यातील बागायत येथे गेली 4 वर्षांपासून कार्यरत असलेला बीएसएनएल टाॅवर उभारण्यात आला होता. काही दिवस सुस्थितीत होता. सर्व ग्राहकांना चांगली रेंज यायची पण गेला महिनाभर हा बीएसएनएल टाॅवर नाॅटरिचेबल आहे. यामुळे येथील ग्राहकांना रेंज नसल्याने कोणाशी संपर्क होऊ शकत नाही. गॅस एजन्सी आहे ती बुकिंग मोबाईलवर करावी लागते. ती झाली नाही तर येथील ग्राहकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही. त्यामुळे येथील ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
तसेच प्रती पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील आई भराडी मातेचा याञौत्सव 4 दिवसावर आला आहे. या याञेला लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येतात. आता सर्वांकडे मोबाईल असल्याने एकमेकांना संपर्क साधायचा असेल तर तो करू शकत नाही.
बागायत येथे बंद अवस्थेत असलेला बीएसएनएल टाॅवरकडे मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार या बंद असलेल्या टाॅवरकडे लक्ष देतील का ?
हा बंद असलेला टॉवर दोन दिवसात सुरू नाही झाला तर येथील ग्राहक आंदोलन करणार आहेत.





