सांगवे येथील तब्बल 80 लाखाच्या कामांची एकाच वेळी भूमिपूजन

माझी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केला कामांचा शुभारंभ

कणकवली : सांगवे गावात जलजीवन मिशन नळपाणी योजना अंतर्गत मंजुर झालेल्या चार कामाचा सिंधुदुर्ग जि प च्या माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सांगवे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल काणेकर माजी सभापती पंचायत समिती सुरेश सावंत, माजी पंचायत समिती सदस्य सौ स्मिता मालडीकर, माजी सरपंच मयुरी मुंज, विजय भोगटे, नाना जाधव ग्राम. सदस्य कैलास सावंत, समीर तावडे माजी सरपंच महेंद्र सावंत, अशोक कांबळे, बबन घोंसालवीस, रमेश म्हापणकर, बाबू वाळके व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सांगवे संभाजीनगर वरची वाडी येथे पूरक नळयोजना करणे- 13 लाख, सांगवे शास्त्रीनगर येथे नळपाणी पाईप लाईन करणे- 7.50 लाख, सांगवे शिवाजीनगर कुंभारगाळू येथे जलजीवन मिशन या योजने अंतर्गत पूरक नळयोजना करणे -24 .50 लाख ,सांगवे आंबेडकरनगर तेलंगवाडी येथे विहीर खोली करण करणे नळपाणी पाईप लाईन करणे- 25 लाख ही कामे भूमिपूजन करण्यात आली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!