क.म.शि.प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

कुडाळ : क.म.शि. प्र.मंडळाचे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य माननीय राजकिशोर हावळ सर, मराठी विभाग प्रमुख साळवी सर, कदम सर, परीट सर, पाटील सर, बागवे सर आणि सर्व शिक्षक,शिक्षिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कुसुमाग्रजांच्या फोटोला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पवार सर यांनी केले. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत आणि मराठी अभिमान गीत गायले. दिशा मुंगी ह्या विद्यार्थिनींनी मराठी दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले व गौरी पाटील या विद्यार्थिनींनी कुसुमाग्रजांची ‘कणा’ नावाची कविता सादर केली. अकरावी विज्ञान या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी सेजल पवार हिने ‘बाप’ नावाची कविता सादर केली. श्री.हावळ सरांनी विद्यार्थ्यांना या दिनानिमित्त वाचनाचे महत्त्व सांगितले,मी स्वतः खूप पुस्तक वाचली आहे तुम्ही सुद्धा पुस्तकं वाचा असं त्यांनी प्रतिपादन केलं. श्री साळवी सरांनी विद्यार्थ्यांना असं आवाहन केलं की मराठीतून शिक्षण घेऊन तुम्ही यूपीएससी/ एमपीएससी होऊ शकता.श्री.परीट सरांनी नटसम्राट या नाटकातील स्वगत सादर केले. श्री.कदम सर या संपूर्ण सोहळ्याचं कौतुक करत असताना म्हणाले की आम्ही आज शारदीय चांदण्यात न्हावून निघालो . कार्यक्रमाचे आभार सौ.सेजल वालावलकर यांनी मानले तर सूत्रसंचालन कुमारी विणा गाड हिने केले.

error: Content is protected !!