जिल्हा मूख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रदीप नायर यांनी हेदुळ येथील शेतकऱ्यांनी केलेल्या नाचणी पिकांची केली पाहणी

पोईप : हेदुळ कार्यक्षेत्रातील प्रगतीशील शेतकरी माजी सरपंच श्री नंददिपक गावडे, श्री कृष्णा गावडे, श्री मोहन गावडे, श्री बाबी गावडे, श्री मनोहर चुरमुले, यांनी केलेल्या नाचनी प्लॉटची आंतरराष्ट्रीय भरड धान्य 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावरून पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा मूख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. प्रदीप नायर, जिल्हा कृषी अधिकारी मा. श्री विरेश अंधारी व मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी मा.श्री अप्पासाहेब गुजर यांनी नाचणी प्लाॅटची पाहणी करून या शेतकऱ्यांनची प्रशंसा केली व जिल्हा परिषद मार्फत जे सहकार्य हवे असेल ते देण्यांचे आश्वासन यावेळी मा. श्री प्रदीप नायर यांनी दिले.

यांच्या समवेत मालवण तालुका कृषी विस्तार अधिकारी श्री गोसावी ,श्री के टी पाताडे, श्री व्ही के जाधव, श्री कांबळे, हेदुळ सरपंच सौ प्रतिक्षा प्रमोद पांचाळ, ग्रामसेविका सौ पीळनकर व शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत अधिकारी यांना शेतकरी श्री नंदु गावडे यांनी नाचणी पीक लावनी पासून ते काढणीपर्यंतची सखोल माहिती दिली. तसेच सर्व अधिकारी यांनी नाचणी प्लाॅटची पाहणी करून प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.

संतोष हिवाळेकर / पोईप

error: Content is protected !!