एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास श्रेयांकन

जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 वे स्थान

अतिग्रे/// एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या
संस्थांना 2024-25 चे श्रेयांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट 300 विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी विद्यापीठांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम,राज्यात पाचवे तर देशात 31 वे स्थान पटकावले.
      विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. उत्तम प्रशासन,उत्तम शिक्षण,सोयी- सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळेच हे श्रेयांकन देण्यात आल्याची माहिती एज्युकेशन वर्ल्ड यांचेकडून देण्यात आले आहे.
        या पुरस्काराबद्दल बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत.
        या श्रेणी बद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन,प्राध्यापक,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!