रिगल कॉलेज कणकवली येथे थीम डीनर कार्याक्रमचे आयोजन

‘रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली येथे रविवार दि.२८ जानेवारी २०२४ “Winter Wonder Land “ थीम डिनर कार्यक्रम ठीक संध्याकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हॉटेल मॅनेजमेंट तृतीय वर्ष विध्यार्थी स्वतः पैसे जमवून, कार्यक्रमाचे आयोजन करतात. यामुळे विध्यार्थ्यांना मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे तसेच मार्केटिंग कसे करायचे याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळतो .या कार्यक्रमाद्वारे विविध अन्नपदार्थांची मेजवानी त्याचबरोबर विध्यार्थ्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम येथे सादर केले जातात.
हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. संजयराव शिर्के सर , प्रा.तृप्ती मोंडकर, प्रा मधुमती मोहिते व प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थी करीत आहेत.कार्यक्रमाचे फूड तिकीट वितरीत सध्या केले जात आहे. फूड तिकीट विकत घेण्याकरिता इवेंट हेड कु. प्रणव पाटील (९३२५८१६५९४) सोबत संपर्क करावा. तरी बहुसंख्य लोकांनी आपल्या विध्यार्थ्यांचे पाठबळ व मनोबल वाढविण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन प्राचार्या तृप्ती मोंडकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कणकवली