“व्हेरेनियम क्लाऊड”च्या MPSC स्कॉलरशिप क्लासेसचा सावंतवाडीत शनिवारी शुभारंभ झाला

150 गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मध्ये व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता पुढचं पाऊल म्हणून MPSC 2024 ची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तील तरुण-तरुणी उच्चस्तरीय अधिकारी व्हावेत यासाठी एमपीएससी परीक्षेसाठी क्लासेस सुरू करण्यात आले आहेत तसेच खास स्कॉलरशिप परीक्षाही घेतली गेली ह्यातून दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस ची खास सुविधा ठेवण्यात आली आहे. ह्या क्लासेस साठी पुण्यातील नामवंत संस्था द्रोणाचार्य् अॕकडमीचे संचालक जयंत सावंत सर यांचे अध्यापन विद्यार्थ्यांना मिळाले.यावेळी व्हरेनियमचे सावंतवाडी हेड विनायक जाधव ,संदिप नाटलेकर,अमित सावंत,साहिल नाईक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कोकणवासीयांच्या प्रेमाखातर कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले आहेत. आज व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड मुळे अनेक गरजू तरुण-तरुणींना कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
12 फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वप्रथम कोकणातील या उपक्रमाची सुरुवात झाली. आपल्या कोकणवासियांसाठी काहीतरी करावं या उद्देशानेच त मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस कंपनी ने तयार केला.
कोकण विकासात महत्वपूर्ण पाऊल
कोकणात अनेक तरुण बेरोजगार आहेत अनेक तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय. आणि त्यासाठीच त् कोकणात डिजिटल तंत्रज्ञान उभं करण्याचा मनोदय व्यक्त केला.
२00 हुन अधिक तरुणांचं भविष्य झालं उज्वल.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० हुन अधिक तरुण तरुणींना रोजगार देऊन आपलं हे स्वप्न सत्यात साकारला आहे. व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे.
प्रतिनिधी, सावंतवाडी





