मराठी भाषा गौरव दिनी सिंधुवैभव साहित्य समूहाचे प्रेरणा साहित्य संमेलन


कणकवली : 27 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली ऑनलाइन प्रेरणा साहित्य सम्मेलन घेणार असून राज्याच्या विविध भागांतील मुरलेले तसेच नवोदित एकवीस साहित्यिक यात सहभागी होणार आहेत.
डॉ. विद्या देशपांडे, सोलापूर. डॉ. मिलिंद शेजवळ, मुंबई. आनंद शेंडे , विदर्भ. संजय कुळये, रत्नागिरी. मुग्धा कुळये, रत्नागिरी. डॉ. सुधाकर ठाकूर, कुडाळ. शैला कदम, मुंबई. श्वेता सावंत, मुंबई. रुपाली दळवी, मुंबई. केशव पवार, पुणे. डॉ. क्षमा वळसंगकर सोलापूर. अंजली मुतालिक, कुडाळ. स्नेहा राणे, फोंडा घाट. बाळा पवार, मुंबई. सतीश पवार, कणकवली. डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, कणकवली. डॉ. अरुण गुमास्ते, देवगड. डॉ. अमूल पावसकर, सावंतवाडी. सूर्यकांत चव्हाण, फोंडाघाट. प्रगती पाताडे, ओरोस. डॉ योगेंद्र जावडेकर, बदलापूर हे साहित्यिक भाग घेणार आहेत.
मराठी भाषा गौरव व वृद्धीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे.

मयुर ठाकूर / कणकवली / कोकण नाऊ

error: Content is protected !!