संस्कार भारती सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार, लोककलाकार् स्नेहमेळावा संपन्न


कणकवली : संस्कार भारतीच्या कोकण प्रांताच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार व लोक कलाकार स्नेहमेळावा कणकवली मध्ये भवानी सभागृह तेली आळी मध्ये थाटात संपन्न झाला . या प्रसंगी कोकण प्रांत सदस्य संजयजी गोडसे, शैलेशजी भिडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री चित्रपट दिग्दर्शक, निर्माते दीपक कदम, कार्यकारी निर्माता राजेंद्र सावंत उपस्थित होते. तसेच निर्माते डॉ. तपसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शैलेशजी भिडे यांनी कलेच्या माध्यमातून प्रबोधन आणी संस्कार भारती ची कार्यप्रणाली आणी उद्देश स्पष्ट केले.
जिल्हा महामंत्री दीपक कदम म्हणाले की जिल्ह्यातील कलाकारांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ कसे निर्माण करता येईल आणी जिल्ह्यातील कलाकारांना संघटित करून सरकार दरबारीं कलाकारांच्या अडचणी समजून घेऊन त्या तिथे मांडून त्यांचं निरसन कस करता येईल याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रशेखर उपरकर, सुप्रिया प्रभूमीराशी, अनिता चव्हाण, अक्षता कांबळी, विवेक वाळके, तन्वी चांदोस्कर, सुदिन तांबे, रोहन पारकर, समीर प्रभूमीराशी आदी जिल्ह्यातील कलाकार आणी कलाप्रेमि उपस्थित होते.

सितराज परब / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!