सावंतवाडी व कुडाळ येथीलसुप्रसिद्ध एस.एम.मडकईकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचा भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला शुभांरंभ

सावंतवाडी व कुडाळ येथीलसुप्रसिद्ध एस.एम.मडकईकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचा शुभांरंभ भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. उभाबाजार रघुनाथ मार्केट समोर हे नवेदालन सुरू करण्यात आले आहे.सोमवारी भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. मडकईकर यांची सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये एक ग्रॅमच्या दागिन्यांची दालने असून ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर सावंतवाडीत प्रशस्त जागेत त्यांनी नव दालन सुरू केलं आहे. गोवा महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने, एक ग्रॅम गोल्डचे दागिने यांसह दागिन्यांसाठीची हत्यारे या ठिकाणी उपलब्ध आहेत. रघुनाथ मार्केट समोरील या नव्या दालनाला ग्राहकांनी भेट द्यावी असं आवहान मडकईकर कुटुंबियांकडून करण्यात आल आहे.याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप नेते महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, शामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर,विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर, प्रियांका मडकईकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी, प्रतिनिधि

error: Content is protected !!